सिंगापूर-होंगकाँगनंतर महाराष्ट्रातही कोरोना वाढतोय

पुणे :- सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्यानंतर, आता महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. राज्यात सध्या ५७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, त्यातील एक रुग्ण पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेला ८७ वर्षीय पुरुष आहे. पुण्यात यंदाचा हा पहिलाच कोरोना रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू सध्या सौम्य प्रकारचा असून घाबरण्याचे कारण नाही.

राज्यातील परिस्थिती:

  • महाराष्ट्रात एकूण ५७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
  • तामिळनाडू, केरळमध्येही रुग्णवाढ
  • २०२४ मध्ये ५,५२ रुग्ण, ३५ मृत्यू
  • २०२५ मध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही

आरोग्य विभागाची तपासणी:
सोमवारी आरोग्य विभागाने ४६ कोरोना चाचण्या केल्या. त्यात १५ आरटीपीसीआर व ३१ रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. प्रशासन सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक:
आज सकाळी ११.३० वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये पुण्यात सापडलेल्या रुग्णावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमाल नुकसानीबाबत मदतीचा निर्णय देखील अपेक्षित आहे.