अभिनेत्री प्रीती झिंटा म्हणते ...."जीवनाच्या चक्रातून मुक्ती......"
.jpeg)
प्रयागराज
: प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा आज बुधवार शेवटचा
दिवस असून येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल
झाले आहेत. गेल्या दीड महिन्यात बॅालीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कुंभला हजेरी लावत
पवित्र स्नान केले. अभिनेत्री प्रीती झिंटाने महाकुंभ मेळ्याला भेट दिली. अभिनेत्रीने
पवित्र संगमात तिच्या आईसोबत डुबकी घेतली. तसेच येथील पवित्र तीर्थ स्थळांना देखील
तिने भेट दिली. प्रीतीने कुंभमेळ्याचा अनुभव शेअर केला आहे. ही तिची कुंभमेळ्याची तिसरी
भेट असल्याचे अभिनेत्रीने उघड केले. तिने या अनुभवाचे जादुई असे वर्णन केले, पण थोडे
वाईटही वाटले, असे ती म्हणाली आहे. महा कुंभमेळ्याच्या भेटीचा व्हिडिओ शेअर करताना
प्रीतीने लिहिले की, ‘कुंभमेळ्यात माझी ही तिसरी वेळ होती आणि ती जादुई, हृदयस्पर्शी
आणि थोडी दुःखद होती. हे जादुई आहे, कारण मी कितीही प्रयत्न केले तरी मला कसे वाटले
ते मी स्पष्ट करू शकत नाही. हे हृदयस्पर्शी आहे कारण मी माझ्या आईसोबत गेले होते आणि
तिचा माझ्यात जीवनात मोठा अर्थ आहे. हा अनुभव थोडं दु:खी का वाटला हे सांगताना ती म्हणाली.