बापूजीनगरात महिलेच्या चेहऱ्यावरॲसिड हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर : 'सून आली का?' असा प्रश्न विचारल्याने चिडलेल्या तरुणाने एका महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून रवी ताकतोडे (रा. स्लँटर हाऊस, बापूजीनगर) याच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔹 कसा घडला प्रकार?
रूपाली अभिजित चंदनशिवे (वय ३५, रा. स्लँटर हाऊस, बापूजीनगर) या आपल्या घरी मुलगा आणि लहान भावासोबत बसल्या होत्या.
यावेळी रवी ताकतोडे घरी आला असता, रूपाली यांनी त्याच्या आईला सून आली का, असे विचारले.
या प्रश्नावरून संतापलेल्या रवीने थांब, तुझ्या अंगावर ॲसिडच टाकतो! असे म्हणत बाटलीतील ॲसिड त्यांच्या चेहऱ्यावर फेकले.
या हल्ल्यात रूपाली चंदनशिवे जखमी झाल्या असून, पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.