3 वर्षं वाट बघणारा अभिमन्यु, मागून 15 खेळाडू पदार्पणात यशस्वी

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट
संघाचा युवा फलंदाज अभिमन्यु ईश्वरन गेल्या तीन वर्षांपासून कसोटी पदार्पणाची वाट पाहतो
आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर तो संघात सहभागी झाला, मात्र एकदाही अंतिम संघात स्थान मिळाले नाही. सततच्या दुर्लक्षामुळे अखेर त्याचे
वडील पुढे आले असून निवड प्रक्रियेवर संतप्त सवाल उपस्थित केले आहेत.
“दिवस नाही, आता वर्षं मोजतोय” – अभिमन्युअचे वडील
एका मुलाखतीत अभिमन्युअचे वडील म्हणाले, "गेल्या तीन वर्षांत तो सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करत आहे,
तरीही कसोटी संधी मिळालेली नाही. खेळाडूचं काम म्हणजे धावा करणं,
आणि अभिमन्यूनं ते सातत्याने केलं आहे."
१५ पेक्षा अधिक खेळाडूंनी केलं
पदार्पण, अभिमन्यु मात्र प्रतीक्षेत
या काळात अनेक नवख्या खेळाडूंनी कसोटी संघात प्रवेश केला, मात्र ईश्वरनला संधी मिळालेली नाही. "सतत काही खेळाडूंना
आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर संधी दिली जाते, आणि
कसोटी क्रिकेटसाठी खऱ्या निकषांकडे दुर्लक्ष केलं जातं," अशी खरमरीत प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“करुण नायरला संधी,
अभिमन्यु मात्र दुर्लक्षित”
ते पुढे म्हणाले, "बॉर्डर-गावस्कर
मालिकेआधी अभिमन्यूनं जबरदस्त धावा केल्या, पण करुण नायर
त्यावेळी संघातसुद्धा नव्हता. तरी त्याला संधी मिळाली. ही निवड पद्धत चुकीची
वाटते."
निवड समितीवर गंभीर आरोप
अभिमन्यूनं 8६४ धावा करूनही संघाबाहेर असणं हे
"निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित
करतं", असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. "अभिमन्यु
निराश आहे, पण अजूनही तो मेहनत घेत आहे. निवड समितीने
देशांतर्गत क्रिकेटला खरा निकष मानावा."