जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना; अनेकजण रेल्वेखाली चिरडल्याची भीती

जळगाव: जळगावजवळच्या पाचोऱ्याजवळ झालेल्या रेल्वे ट्रॅकवरील भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेत अनेकांना समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस  रेल्वेने चिरडल्याचे अधिकृत वृत्त आहे. या अपघातामुळे शेजारील रेल्वे रुळावर रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

 या घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शीप्रवाशांनी दिलेली माहिती अशी, पुष्पक एक्सप्रेसला ब्रेक लावल्याने  ठिणग्या मोठ्या प्रमाणात उडाल्या. यावेळी प्रवाशांना आग लागली असं वाटले, यामुळे प्रवाशांनी अचानक रेल्वेतून उड्या मारण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या ट्रकवरुन बंगळुरु एक्सप्रेस गाडी येत होती. या रेल्वेखाली अनेक प्रवाशी चिरडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाने या अपघाताला अधिकृत दुजोरा दिला आहे याशिवाय मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 या अपघाताबद्दल अधिकृत माहिती आणि घटनाक्रमाचा तपशील जनसंपर्क अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जनसंपर्क अधिकारी

स्वप्नील नीला म्हणाले, हा एक्स्प्रेसचा अपघात नाही, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी एसीपी अर्थात अलार्म चेन पुलिंग झालं होतं. लखनौवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली पुष्पक एक्स्प्रेस साधारण ४ वाजण्याच्या सुमारास जळगाव स्थानकातून निघाली होती. त्यानंतर पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ आलार्म चेन पुलिंग झालं होतं, त्यामुळं या ठिकाणी ही रेल्वे थांबली. त्यानंतर काही प्रवाशी हे रेल्वेमधून खाली उतरले होते.

त्याचवेळी विरुद्ध बाजूनं येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं त्यांना धडक दिली. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत, या प्रवाशांना आम्ही वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच स्थानिक प्रशासनाकडून आम्ही मदत घेत आहोत. त्याचबरोबर रेल्वेची अपघात वैद्यकीय रिलीफ व्हॅन असते ती देखील भुसावळवरुन निघाली आहे. घटनास्थळी काही वेळातच पोहोचेल.

या अपघातापूर्वीचे काही व्हिडिओ देखील माध्यमांमध्ये समोर आले आहेत. यामध्ये चेन पुलिंगनंतर पुष्पक रेल्वे ट्रॅकवर थांबवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक डब्यांमधून खाली उतरले होते. मोठ्या प्रमाणावर या लोकांनी ट्रॅकवर गर्दी केल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुष तसेच काही महिला आणि लहान मुलंही दिसत आहेत. त्यामुळं या अपघतात सध्याच्या घडीला १३ ते १४ जणांचा रेल्वेच्या  धडकेतमृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.