आलमटी जवळ टेंपो व ट्रॅक्टर धडक, 10 जण गंभीर जखमी

विजयपूर - आलमटी जलाशयाच्या उजव्या भागातील बागलकोट जिल्ह्यातील सितम्मानगुड जवळ टेंपो व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या धडकेत टेंपो मधून प्रवास करणारे 10जण गंभीर जखमी झाले असून 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात आज सायंकाळी झाला आहे.

 सितम्मानगुड येथील लवकुश उद्यावन बघून आलमटी कडे येत असताना टेंपो चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणारा ऊस भरलेल्या ट्रॅक्टर ला जोरदार धडक दिली. 

 टेंपो मधून प्रवास करणारे यादगिरी जिल्ह्यातील सुरपुर तालुक्यातील जैनापूर व किरीदळ्ळी गावातील रहिवासी असून हे सर्व जण तीन दिवसांपूर्वी श्री क्षेत्र सौदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन सोमवारी आलमटी उद्यावन पाहून आलमटी धरण येथील कारंजा पाहण्यासाठी येत असताना हा अपघात घडला आहे

.दीपक शिंत्रे