पत्रकाराने समाजाच्या वेदना मांडावेत; पवार

मंद्रूप,दि.६

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसाही संबोधला जातो.पत्रकार बांधवांनी समाजातील गोरगरीब, वंचित, शेतकरी बांधव आणि कष्टकऱ्यांच्या समस्या निर्भीडपणे मांडून त्यांना न्याय मिळवून द्यावेत असे आवाहन मंद्रूप पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले. सोमवारी, मंद्रूप पोलीस ठाण्यामध्ये मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली तत्पूर्वी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, अमोगसिध्द लांडगे उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले,

लोकशाहीमध्ये पत्रकार हा महत्त्वाचा घटक आहे पत्रकार बांधव समाजातील समस्यावर प्रहार केल्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत.वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यममुळे आज अनेक प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत.देशाच्या आम्ही समाजाच्या विकासामध्ये पत्रकार बांधव, विविध वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचे मोठे योगदान आहे पत्रकारांनी पत्रकारिता करीत असताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले. पोलिस हे मंद्रूप पोलीस  ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली. यावेळी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष स्वामी म्हणाले, समाजातील समस्या आणि जनतेवरील होणारे अन्याय आम्ही  यापुढील काळातही लेखणीतून निर्भीडपणे  मांडू अशी ग्वाही दिली.

यावेळी संघटनेचे

उपाध्यक्ष बालाजी वाघे,महासिद्ध साळवे,

सचिव नितीन वारे,सहसचिव;अप्पू देशमुख

कार्याध्यक्ष शिवराज मुगळे,

कोषाध्यक्ष दिनकर नारायणकर,

खजिनदार समीर शेख,

संघटक अशोक सोनकंटले,

प्रसिद्धी प्रमुख अभिजीत जवळकोटे, गिरमल्ल गुरव,महेश पवार,शिवय्या स्वामी,

 बनसिद्ध देशमुख,आरिफ नदाफ, बबलू शेख आदी उपस्थित होते.