3 फेब्रुवारी रोजी होणार भव्य रिंगण सोहळा

सोलापूर ; सोलापूर शहर व जिल्ह्यातील माघवारीला
जाणाऱ्या सर्व दिंडीचे एकत्रीकरण अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून करून
प्रस्थान व रिंगण सोहळा सुरु केला आहे. माघ शुद्ध षष्टीला दि. 03-02-2025 रोजी
श्री मार्कंडेय मंदिर, पंचकट्टा सोलापूर येथे दु. 4.00 वा.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी पूजन नागनाथ शिंदे महाराज ,
महेश जाधव महाराज यांचे हस्ते केले जाणार आहे. वारकरी प्रथे प्रमाणे
नित्य नियमाचे अभंग व भजन केले जाणार आहे. त्यावेळी जे उपस्थित सर्व दिंडीतील
विणेकरी महाराज व पदाधिकारी यांचा श्री सुरेश फलमारी पद्मशाली ज्ञाती संस्था,
सोलापूर यांचे कडून सन्मान केला जाणार आहे. हा पालखी सोहळा "
ज्ञानोबा तुकाराम " भजन करत नॉर्थकोट
प्रशाला मैदान, सोलापूर येथे पोहोचेल आणि नंतर मान्यवर व
श्री उमाकांत मिटकर , प्रदीप मोरे महाराज यांचे हस्ते अश्व
पूजन केले जाईल व मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. तदनंतर गोल रिंगण लाऊन घेतले
जाईल. पहिले रिंगण ध्वजाधारी करतील कारण दिंडीची सुरुवात पताका ने होते. तुळशी
वृंदावनधारी महिला व मृदंगाचे रिंगण झाल्या नंतर विणेकरी रिंगण केले जाणार आहे.
शेवटी अश्व रिंगण करण्यासाठी कर्नाटक अंकली येथून
माऊलींचे अश्व येणार आहेत हे सोलापूर भाविकांचे परम भाग्य आहे. हा सोहळा श्री
महादेव मंदिर साठे चाळ, सोलापूर येथे पोहोचेल व नंतर आनंद
चंदनशिवे , विजय चोरमुले यांच्या हस्ते आरती करून समारोप
केला जाणार आहे. या मध्ये शहरातील 38 व परिसरातील 25 दिंडी सहभागी होतील. हा सोहळा
पाहण्यासाठी शहरातील व परिसरातील हजारो महिला व पुरुष भाविक उपस्थित राहतील.तसेच
सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असून
या सर्व कार्यक्रमासाठी जोतिराम चांगभले (प्रदेशअध्यक्ष ), बळीराम
जांभळे (राष्ट्रीय सचिव ), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ),
मोहन शेळके (प्रदेश सचिव ) , बंडोपंत कुलकर्णी
(जिल्हा अध्यक्ष ), संजय पवार (शहरअध्यक्ष ) व सर्व
पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. माघवारीतील
दुसरे गोल रिंगण दि. 05-02-2025 रोजी स. 9.30 वा. पाटकर वस्ती, कुरुल ता. मोहोळ येथे होणार आहे. तिसरे गोल रिंगण महात्मा गांधी विद्यालय,
पेनूर येथे होणार असून चौथे गोल रिंगण श्री दत्त विद्यालय, सुस्ते ता. पंढरपूर येथे होणार आहे. तसेच दि. 07-02-2025 स. 9.30 वा.
जलाराम मठ समोर, पंढरपूर येथे उभे रिंगण होणार आहे.