तोळणूरचे दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी रुपेरी पडद्यावर

अक्कलकोट : तालुक्यातील तोळणूर गावचे सुपुत्र आणि झी कन्नड सारेगमप फेम दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांनी कन्नड चित्रपट “जनरींदा नानू मेले बंदे” साठी दोन गाणी गायन करत पार्श्वगायन क्षेत्रात प्रवेश केला आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन नवीलुगरी नवीन, निर्मिती हेमावती तर संगीत संयोजन प्रणव सतीश यांनी केले आहे. रेवणसिद्ध फुलारी यांनी याआधी झी कन्नड सारेगमपमध्ये टॉप-४ मध्ये स्थान मिळवत संपूर्ण कर्नाटक व देशभरात संगीत कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून सीमावर्ती भागातील कन्नड- मराठी संगीत प्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.