सोलापूर पुणे महामार्गावर भुईंजे गावाजवळ सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकरला दुचाकीची पाठीमागुण जोरदार धडक पती पत्नी गंभिर जखमी

दिनांक
११ जून २०२५ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे
महामार्गावर भुईंजे गावाजवळ मुंबई येथून शेडम येथे जात असताना एका सिमेंट वाहतूक
करणाऱ्या बलकर क्रमांक MH 12 RN 8634 ला एका दुचाकी क्रमांक MH
11 BJ 5525 ने पाठीमागुण जोरदार धडक देऊन
झालेल्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे पती पत्नी गंभिर जखमी झाले असून सदर
जखमी व्यक्तींना स्थानिक लोकांनी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील
उपचारासाठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील
ग्रस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस
मदत केंद्राचे अधिकारी आणि त्यांचे
कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलिस
स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री. जगताप साहेब आणि श्री. सरडे साहेब
यांना दिली असल्याची माहिती सावळेश्वर टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख
श्री.संतोष खडके साहेब यांनी दिली आहे.
(दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या गंभीर जखमी
झालेल्या व्यक्तींची पुर्ण माहिती अद्याप मिळाली नाही)