*सिंदगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा गुन्हा उघडकीस
.jpeg)
विजयपूर : दिनांक 27.11.2024 रोजी पहाटे 02:30 ते 03:00 या वेळेत यंकंची गावातील सेवावृत्त शिक्षिका श्रीमती सातव्वा विठ्ठल
कांबळे, या आपल्या घरी झोपेत असताना, अज्ञात दोन व्यक्ती त्यांच्या घरात घुसून, त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 6,000/- रुपये रोख व 50 ग्रॅम सोन्याच्या 2 पाटल्या, 50 ग्रॅम सोन्याच्या 4 बिल्वर बांगड्या, एकूण 6,00,000/- रुपये किमतीचे दागिने
जबरदस्तीने लुटून नेले होते. यासंबंधी श्रीमती सातव्वा विठ्ठल कांबळे यांनी
दिलेल्या तक्रारीवरून सिंदगी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकर मारीहाल, रामनगौड हत्ती व जगदीश एच.एस., डीएसपी, इंडी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री नानागौड पोलीस पाटील, CPI सिंदगी यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक गठित करण्यात आले. या पथकात
सिंदगी पोलीस ठाण्याचे पीएसआय आरिफ मुशापुरी, ऐएसआय जे.एस. गलगली व अन्य कर्मचारी सामील होते. खात्रीशीर माहितीच्या आधारे, चांदकवठे गावाजवळ संशयित प्रशांत सिद्धाराम नावी, वय 31 वर्षे, रा. देवर निंबर्गी, ता. चडचण याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता
त्याच्याकडे 1 देशी बनावटीचे पिस्तुल व 4 जिवंत काडतुसे मिळाली. चौकशीदरम्यान त्याने यंकंची गावातील दरोड्यातील
दागिने इंडी मुथूट फायनान्स व जिल्हा सहकारी बँकेत तारण ठेवले असल्याचे, तसेच मध्यप्रदेशातून आणलेल्या आणखी 2 देशी पिस्तुलं लपवून ठेवले असल्याचे उघड झाले शस्त्र सापडल्यामुळे त्याच्यावर सिंदगी पोलीस ठाण्यात अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरोड्याच्या तपासात त्याच्याकडून इंडी मुथूट फायनान्स व जिल्हा सहकारी
बँकेत तारण ठेवलेले 50 ग्रॅमच्या 2 पाटल्या व 20 ग्रॅमच्या 2 बांगड्या, एकूण 70 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करून न्यायालयात सादर करण्यात आले. पुढील
तपासात त्याच्या घरातून 2 देशी पिस्तुलं व 8 जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. अशा प्रकारे प्रशांत
सिद्धाराम नावी याच्याकडून एकूण *70 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 देशी पिस्तुलं व 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत.