उत्तरमध्ये ८२ टक्के तर दक्षिणमध्ये ६४ टक्के मतदान ; उत्तरमध्ये मानेंना तर दक्षिण'मध्ये शिवदारे,हसापुरे यांना सर्वाधिक मते

सोलापूर बाजार समिती निवडणूक विश्लेषण 

सोसायटी एकतर्फी, ग्रामपंचायत झाली चुरशीची...!

पंचाक्षरी स्वामी .

३मंद्रूप: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सचिन कल्याणशेट्टी,दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे यांच्या पॅनलला उत्तर सोलापूर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील एकूण ५६ पैकी ७०५ म्हणजेच २.३५  टक्के असे एकतर्फी मतदान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात १०३९ पैकी ६७५ मते मिळाली यांची टक्केवारी ६४.९६  इतकी आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातील सर्व अकरा जागा तब्बल ९२ मतांच्या विक्रमी आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात मनिष देशमुख आणि रामप्पा चिवडशेट्टी,अतुल गायकवाड, सुनील कळके यांनी मत्ताधिक्य मिळविल्याने हे चौघेजण ग्रामपंचायत मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बाजार समितीची निवडणूक आमदार कल्याणशेट्टी,माजी आमदार माने, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक हसापुरे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, माजी उपसभापती नरोळे त्यांच्या पॅनल विरुद्ध आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी उपसभापती बाळासाहेब शेळक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी उपसभापती महादेव चाकोते त्यांच्या पॅनल मध्ये रंगली होती. उत्तर सोलापूर तालुक्यातील ५ टक्के सोसायटीवर माजी आमदार दिलीप माने यांचे वर्चस्व आहे. त्याचा पुरेपूर फायदा पॅनलला झाला आहे. येथील ५६ पैकी ७०५ मते विजजी पॅनलला मिळाली आहेत. आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला केवळ १३० मते मिळाली आहेत. येथे ५७५ मतांची विक्रमी आघाडी विजयी पॅनलला मिळाली आहेत.तर एकूण १९ मते बाद झाली आहेत. उत्तर तालुक्यात सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघात मानेंना  सर्वाधिक ७०५ मते,शिवदारे यांना ६९१ तर हसापुरे यांना ६१ मते मिळाली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात सोसायटीचे १ हजार ३९ मतदार आहेत.यातील ६७५ मते कल्याणशेट्टी,माने,हसापुरे,शिवदारे पॅनलला मिळाली आहेत. याची टक्केवारी ६४  इतकी आहे तर आमदार देशमुखांच्या पॅनलला ३५ मतदान मिळाले आहे.दक्षिणमध्ये विजयी पॅनलला  ६ १ मतांची आघाडी मिळाली आहे येथे ४३ मते बाद झाली आहेत. दक्षिण सोलापुरात शिवदारे यांना सर्वाधिक ६७५ मते,हसापुरे यांना ६७१ तर मानेंना ६५७ मते मिळाली आहेत.नागण्णा बनसोडे यांना उत्तरमध्ये ६७,उदय पाटील ६६४ प्रथमेश पाटील ६६० श्रीशैल नरोळे यांना ६४९ मते मिळाली तर दक्षिण'मध्ये बनसोडे यांना५९ प्रथमेश पाटील यांना ६१० तर उदय पाटील ६१२ तर नरोळे यांना ५९५ मते मिळाली आहेत. सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघ इंदुमती अलगोंड-पाटील यांना उत्तर तालुक्यात ६५ दक्षिणमध्ये ६४० मते मिळाली आहेत.अनिता विभुते यांना उत्तरमध्ये ६६ तर दक्षिण'मध्ये ६१४ मते मिळाली आहेत. निलाबाई पुजारी यांना उत्तरमध्ये १२ दक्षिणमध्ये ३२५ तर पुष्पा गुरव यांना उत्तरमध्ये १४० दक्षिणमध्ये ३४२ मते मिळाली आहेत. सोसायटी इतर मागास प्रवर्गात सरळ लढत झाली.येथे अविनाश मार्तंडे यांना उत्तरमध्ये ७०२ दक्षिण'मध्ये ६४३ मते मिळाली आहेत.तर सुभाष तेली यांना उत्तरमध्ये १३६ तर दक्षिण'मध्ये ३३९ मते मिळाली आहेत. सोसायटी विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदारसंघात सरळ लढत झाली आहे.येथे सुभाष पाटोळे यांना उत्तरमध्ये ७०१ तर दक्षिण'मध्ये ६४२ मते मिळाली आहेत.संदीप टेळे यांना उत्तरमध्ये १३ तर दक्षिण'मध्ये १४२ मते मिळाली आहेत. आमदार देशमुख यांच्या पॅनलमधील चर्चेत उमेदवार अप्पासाहेब पाटील -वडकबाळकर यांना उत्तर तालुक्यात १२४ तर दक्षिण'मध्ये ३५ तसेच डॉ चनगोंडा हविनाळे यांना उत्तरमध्ये १३५ तर 'दक्षिण' सोलापूरमध्ये ३४२ मते मिळाली आहेत.

 

देशमुख-चिवडशेट्टी यांनी आघाडी कायम राखली...

मनिष देशमुख यांना उत्तर तालुक्यात १९६  तर दक्षिण'मध्ये ४४० रामप्पा चिवडशेट्टी उत्तरमध्ये १६७ तर दक्षिण'मध्ये ४४ मते मिळाली आहेत.संगमेश बगले यांना उत्तरमध्ये १५३ तर ३२९ मते मिळाली आहेत.गणेश वानकर यांना उत्तर तालुक्यात १७० तर दक्षिणमध्ये २६० मते मिळाली आहेत. मनिष देशमुख यांना सोलापूर केंद्रावर ४१,ति-हे ५४ नान्नज १०१ निंबर्गी ९२ मंद्रूप ११४ आहेरवाडी १०० वळसंग ७२ बोरामणी केंद्रावर ६२ मते मिळाली आहेत. रामप्पा चिवडशेट्टी यांना सोलापूर केंद्रावर ३६ ति-हे  ४३ नान्नज ८८ निंबर्गी ७६ मंद्रूप १०२ आहेरवाडी १२६  वळसंग ५  बोरामणी केंद्रावर ५९ मते मिळाली आहेत. संगमेश बगले यांना सोलापूर केंद्रावर ३१ ति-हे ५७ नान्नज ६५ निंबर्गी ६० मंद्रूप ५ आहेरवाडी ४५ वळसंग ६९ बोरामणी केंद्रावर ९७ मते मिळाली आहेत.गणेश वानकर यांना सोलापूर केंद्रावर ३१ ति-हे ६५ नान्नज ७४ निंबर्गी ५४ मंद्रूप ३ आहेरवाडी २१ वळसंग ५५ बोरामणी केंद्रात ९२ मते मिळाली आहेत. देशमुख व चिवडशेट्टी यांना सोलापूर, नान्नज केंद्रावर अनुक्रमे १० व २७ मतांची आघाडी घेतली आहे.दक्षिणमध्ये निंबर्गी केंद्रावर ३२ मंद्रूप ५६ आहेरवाडी १ वळसंग १६ अशी आघाडी घेतली आहे.आहेरवाडी केंद्रात चिवडशेट्टी यांना १२६ तर देशमुख यांना १०० मते मिळाली आहेत.नान्नज केंद्रात देशमुख यांना १०१ तर चिवडशेट्टी यांना ८८ मते मिळाली आहेत.ति-हे केंद्रात बगले व वानकर ९ बोरामणी केंद्रात ३५ मतांची आघाडी मिळाली आहे.

बोरामणी भागाने सुनील कळके यांना तारले..

आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक सुनील कळके यांना उत्तर तालुक्यात १७२ तर दक्षिण तालुक्यात ३९ मते मिळाली आहेत.आमदार सुभाष देशमुख समर्थक यतीन शहा यांना उत्तरमध्ये १७ दक्षिण'मध्ये ३४९ मते मिळाली आहेत.शहा यांना उत्तरमध्ये १५ मतांची आघाडी मिळाली तर कळके यांना ४९ मतांची आघाडी मिळाली आहे.शहा यांनी सोलापूर १३, नान्नज २१ निंबर्गी २६ मंद्रूप ४९ आहेरवाडी ४२  मतांची आघाडी घेतली आहे.सुनील कळके यांना ति-हे १९ वळसंग केंद्रात ५५ बोरामणी केंद्रात कळके यांना १११ मिळाली आणि ती निर्णायक ठरली.यतीन शहा यांना बोरामणी मतदान केंद्रावर केवळ २४ मते मिळाली आहेत.आणि येथेच त्यांचा पराभव निश्चित झाला.

'दक्षिण'मधील आघाडीमुळे अतुल गायकवाड विजयी

सुभाष देशमुख समर्थक अतुल गायकवाड यांना नान्नज केंद्रावर २२ निंबर्गी २१ मंद्रूप ४३ आहेरवाडी केंद्रावर ७९ मतांची आघाडी मिळाली आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक रविंद्र रोकडे यांना सोलापूर केंद्रावर ६ ति-हे १९ वळसंग १३ तर बोरामणी केंद्रात ६६ मतांची आघाडी मिळाली आहे.