छत्तीसगडमध्ये विषारी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू

बिलासपूर : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत
विषारी दारू पिऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
त्यांच्यावर सिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कोनी येथील लोफांडी येथे
घडली. गेल्या चार दिवसांत गावात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासकीय अधिकारी आणि
पोलिस गावात पोहोचले तेव्हा एक मृतदेह वगळता सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात
आले होते. एक मृतदेह छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (सिम्स) बिलासपूर
येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.