राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच विविध विभागांशी संबंधित असे 6 मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठीत डान्सबार बंदी कायद्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. डान्सबार बंदी कायद्यात सुधारणा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या अधिवेशनात डान्सबार बंदी कायद्यात सुधारणा करण्याबाबतचं विधेयक मांडलं जावून मंजूर केलं जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार नव्या कायद्यात सुधारणा अपेक्षित आहेत. येत्या अधिवेशनात याबाबतच्या दुरुस्ती होताना बघायला मिळतील. याचबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. सिंचन विभागाच्या आरोपांप्रकरणी आपण राजीनामा दिला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे खरंच राजीनामा देणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.