सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी ₹५०० मुद्रांक शुल्क माफ

मुंबई : राज्यातील लाखो
विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या
लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी आवश्यक असलेले ₹५०० चे मुद्रांक शुल्क तातडीने माफ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोणत्या प्रमाणपत्रांसाठी शुल्क माफ?
✅ जात पडताळणी प्रमाणपत्र
✅ उत्पन्नाचा दाखला
✅ रहिवासी प्रमाणपत्र
✅ नॉन-क्रिमीलेयर
प्रमाणपत्र
✅ राष्ट्रीयत्व
प्रमाणपत्र
✅ इतर शासकीय
कामांसाठीचे प्रतिज्ञापत्र
विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना
फायदा
🔹 यापुढे एका साध्या
कागदावर सेल्फ-अटेस्टेड अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकते.
🔹 दहावी आणि बारावी परीक्षेनंतर आवश्यक
कागदपत्रांसाठी होणारा ३ ते ४ हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे.
🔹 यापूर्वी १०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत
वाढवलेले शुल्क विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना आर्थिक फटका देत होते. मात्र,
या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.