४ वर्षीय बालकाचे अपहरण आणि खून; आरोपीला अटक

मुंबई :- कांदिवली येथील इराणी वाडीत एका ४
वर्षीय बालकाचे अपहरण करून खून केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
या प्रकरणात २५ वर्षीय अक्षय अशोक गरूड याला पोलिसांनी सुरत येथून अटक केली. सीसीटीव्ही
फुटेजमधून आरोपीचा मागोवा
पीडित बालकाच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर
अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कांदिवली पोलिसांनी सुमारे २००
सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर आरोपी सुरत येथे असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकाचा
धक्कादायक कट
तपासादरम्यान, आरोपी हा पीडित कुटुंबाचा
नातेवाईक असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
सध्या आरोपी कांदिवली पोलिसांच्या ताब्यात असून त्याने हे कृत्य का केले याचा तपास
सुरू आहे.