महायुतीचे ३५ नेते शपथ घेण्याची शक्यता
.jpeg)
नागपूर, दि. १३-
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवार, १५ डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे.
यावेळी महायुतीचे ३५ नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. हा शपथविधी नागपुरात
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचा मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ?
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला
येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळू शकतो. मंत्र्यांचा पहिल्या अडीच
वर्षांचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षांचा कालावधी
मंत्रिपदासाठी मिळणार आहे. शिवसेनेच्या या अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यामुळे
शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या
संख्येला मंत्रिपदाची संधी मिळणार असून मंत्रिमंडळ
विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधिक आमदारांना
मंत्रिपदाची संधी देणारा फॉर्म्युला असणार आहे.
म्हणजेच, शिवसेनेला १० मंत्रिपदे मिळत असतील तर या
पाच वर्षांत २० आमदारांना मंत्रिपदे मिळणार आहेत. सूत्रांनुसार, पहिल्या अडीच वर्षांत मागील मंत्रिमंडळातील नेत्यांना डच्चू मिळू शकतो. तर,
काही नवीन
भाजपचे संभाव्य मंत्री ?
१) चंद्रशेखर बावनकुळे
२) सुधीर मुनगंटीवार
३) राधाकृष्ण विखे-पाटील
४) गिरीश महाजन
५) चंद्रकांत पाटील
६) रवींद्र चव्हाण
७) संभाजी पाटील
८) अतुल सावे
९) परिणय फुके
१०) संजय कुटे
११) पंकजा मुंडे
१२) मेघना बोर्डीकर
चेहरे समोर येऊ शकतात. त्यात संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, खोतकर
आणि शिवतारे यांच्या नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.