२०२४ च्या लोकसभा निवडणुक

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात महायुतीचा
सुपडा साफ झाला होता. तर विधानसभा निवडणुकीत सोलापूर भागामध्ये भाजपला चांगले यश
मिळाले. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सोलापूर
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीला पराभव पत्करावा लागला. या भागात
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिसून आली. राज्यात महायुतीचे
सरकार सत्तारूढ झाले. यामुळे आता जे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आहेत, त्यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल, अशी आशा आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांची पक्षाच्या वरिष्ठांनी
समजूत घालून त्यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त केले. त्यांनी पंढरपूर
मतदारसंघात आमदार समाधान आवताडे यांचा प्रचार केला व त्यांना विजयी केले. पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक यांना लवकरच विधानपरिषदेवर घेतले
जाईल, असे आश्वासन परिचारक समर्थकांना दिले होते. यामुळे
साहजिकच हा गट आता वरिष्ठांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील
यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनाही शिंदे शिवसेना विधानपरिषदेवर घेईल, अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटाची भक्कमपणे बाजू तत्कालीन
आमदार शहाजीबापू पाटील यांनी लावून धरली होती. एकनाथ शिंदे यांचा शहाजीबापूंवर
मोठा विश्वास असून ते त्यांना विधानपरिषदेत घेतील, असे पाटील
समर्थकांना वाटते. सोलापूर जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे शहाजी पाटील हे एकमेव आमदार
होते. मात्र त्यांचाही आता येथे पराभव झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय
घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्याशी
राजकीय संघर्ष करणारे माजी आमदार राम सातपुते यांना विधानपरिषदेवर भारतीय जनता
पक्षाने घ्यावे, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातून जोर धरू
लागली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यानंतर तत्कालीन माळशिरसचे आमदार
सातपुते यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवली.
मात्र, काँग्रेसच्या उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांनी
त्यांचा पराभव केला. यानंतर विधानसभेला सातपुते यांनी पक्षाचा आदेश पाळून माळशिरस
विधानसभा पुन्हा लढवली. २०१९ ला त्यांना साथ देणारे मोहिते पाटील हे यंदा सातपुते
यांच्या विरोधात होते. येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार
उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर विभागासह सोलापूर
जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुतीला पराभवाचा झटका बसला. त्यामुळे आता पराभूत उमेदवार
विधानपरिषदेवर आपल्याला घेतले जाईल, अशी आशा बाळगून आहेत. यातच भाजपसह अन्य पक्षांनी
निवडणुकीपूर्वी काहींना आमदार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचे समर्थकही आता
मुंबईकडे डोळे लावून बसले आहेत.
• पंढरपूर
प्रशांत आराध्ये
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली ताकद उभी केली
होती. यामुळे सातपुते यांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी दिलेली लढत ही लक्षणीय होती. याच
मतदारसंघातले असणारे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे
विधानसभा निवडणुकीत तटस्थ राहिले. हे पाहता त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी,
अशी मागणी सातपुते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता माळशिरस
तालुक्यात मोहिते पाटील गटाला शह देण्याकरता सातपुते यांना विधानपरिषदेवर घ्यावे
अशी मागणी जोर धरत आहे. भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत
काय निर्णय घेणार हे लवकरच दिसून येईल. सातपुते हे फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील गटाविरोधात लढण्याकरता भाजपलाही अशाच आक्रमक
नेतृत्वाची गरज आहे. यामुळे सातपुते यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल अशी चर्चा
रंगत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची मागील अनेक वर्षांपासून साथ
करणारे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचाही या विधानसभा निवडणुकीमध्ये
बार्शीत पराभव झाला आहे. बार्शी मतदारसंघ हा मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याच्या
सीमेवर असल्याने राजकारणात तो महत्त्वपूर्ण मानला जातो. यामुळे राऊत यांना ताकद
देण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस त्यांना विधानपरिषदेवर घेतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. आजवर फडणवीस हे कायमच त्यांच्या पाठीशी
भक्कमपणे उभे आहेत तर राऊत यांनीही कायम फडणवीस यांची साथ केली आहे. हे पाहता
बार्शी भागात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांनाही विधानपरिषदेवर घेतले जाऊ शकते
असा अंदाज आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील गटाला
शह देणारे माजी आमदार बबनराव शिंदे व संजय शिंदे यांना या विधानसभा निवडणुकीत
पराभवाला सामोरे जावे लागले. बबनराव शिंदे हे निवडणूक रिंगणात नव्हते. मात्र, त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली तसेच संजय शिंदे
यांनी करमाळ्यातून पुन्हा नशीब अजमावले मात्र, या
काका-पुतण्यांना माढा व करमाळ्यात पराभव पत्करावा लागला. बबनराव शिंदे यांनी
निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली होती व त्यांनी शरद पवार
यांच्या पक्षाकडे आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितली. मात्र ती त्यांना मिळाली
नव्हती. यामुळे त्यांनी रणजित शिंदे यांना अपक्ष उभे केले होते, या दोन्ही मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिंदे बंधू यांचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष
शरद पवार या सर्वांशीच कायमच संबंध चांगले राहिले आहेत. आता विधानसभा निवडणुकीतील
पराभवानंतर शिंदे गट आत्मपरीक्षण करत असून ते आगामी काळात कोणता पक्ष निवडणार हे
पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यामुळे शिंदे बंधू
पुन्हा अजित पवार यांची साथ करणार की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजपला पसंती
देणार हे लवकरच कळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता
महायुती शिंदे बंधूंना पुन्हा जवळ करून येथे मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांना
ताकद देण्याची शक्यता आहे. यासाठी कदाचित एखादी विधानपरिषद आमदारकी त्यांना दिली जाऊ
शकते.