2014 बॅचचे IFS अधिकारी कुलराज सिंग सोलापुरात

सोलापूरच्या उपवनसंरक्षकपदी IFS कुलराज सिंग यांची नियुक्ती झाली आहे. तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही नियुक्ती झाली असून, कुलराज सिंग हे गुरुवारी पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी IFS कुशाग्र पाठक हे सोलापूरच्या उपवनसंरक्षकपदी कार्यरत होते, मात्र फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांची चंद्रपूरला बदली झाल्यानंतर सोलापूरच्या वनविभागाची जबाबदारी पुणे उपवनसंरक्षकांकडे अतिरिक्त पदभार म्हणून देण्यात आली होती.


कुलराज सिंग यांचा परिचय

  • IFS बॅच: 2014
  • मूळगाव: चंदीगड, पंजाब
  • शिक्षण: पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी
  • पूर्वीचे पद: नागपूर वन्यजीव विभागात प्रशासन व व्यवस्थापन उपवसंरक्षक
  • छंद: सायकलिंग, फोटोग्राफी आणि निसर्ग भ्रमंती

वन विभागातील अन्य बदल IFS तुषार चव्हाण (पुणे उपवनसंरक्षक) यांची सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी मंत्रालयातील उपसचिव विवेक होशिंग यांची नवीन उपवनसंरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.