मोहोळ तालुक्यात २ हजार ३६८ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

कुरुल दि- १० :११फेब्रुवारी पासून सुरू होणारी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणामध्ये मोहोळ  तालुक्यातील दोन  हजार तीनशे  आडोसष्ठ विध्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अविचल महाडीक यांनी दिली आहे. 

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या या बारावी परीक्षेसाठी तालुक्यातून ,मोहोळ, येथे दोन,शेटफळ, अनगर, अंकोली, कामती बुद्रुक अशी एकूण, सहा,परीक्षाकेंद्रे आहेत. 

सुसज्ज अशा परीक्षा केंद्रावरती परीक्षार्थींना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून.परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी  भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षा कालावधी मध्ये हे पथक अचानक भेट देऊन तपासणी करणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरती बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

बारावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये परीक्षा देण्यासाठी जास्तीत जास्त उपाययोजना  करून सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा देण्यात येणार आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अविचल महाडीक यांनी दिली आहे.

- सुभाष शिंदे वार्ताहर कुरूल