विजयपूरात २ अवैध पिस्तूल, काडतुसे जप्त, एकास अटक

विजयपूर : एपीएमसी
पोलिस ठाण्याच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील इंडी बायपास रस्ता
राष्ट्रीय मार्गाजवळ एका व्यक्तीकडून पोलिसांनी अवैध पिस्तूल जप्त केली आहे. पोलिसांनी २ गावठी पिस्तूलसह ४ जिवंत काडतुसे
जप्त केल्या आहेत. ए.पी.ए.एम.सी.
पोलिसांनी शहरातील गँग बॉऊडि येथील
रहिवासी उमेर बंदेनवाज गिरगांव (वय २३) याला अटक केली आहे. पक्की माहितीच्या
आधारावर पोलिसांनी छापेमारी केली असून, ए.पी.ए.एम.सी. पोलिस
ठाण्यात कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अटक केलेला उमेर
अनधिकृतपणे पिस्तूल खरेदी करून, विक्री करण्याच्या उद्देशाने
पिस्तूल बाळगून होता, असे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण
निबंरगी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.