१३ वर्षांच्या मुलाची अपहरणानंतर हत्या – ‘ड्रायव्हर’ ओळखीच्या व्यक्तीकडून विश्वासघात

कर्नाटकाची राजधानी बंगळुरू पुन्हा एकदा थरकाप उडवणाऱ्या गुन्ह्यामुळे चर्चेत आली आहे. ३० जुलै रोजी, निश्चित ए (१३) नावाचा आठवीत शिकणारा मुलगा संध्याकाळी ट्यूशनला गेला आणि परतलाच नाही. त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह दुसऱ्या दिवशी फॅमिली पार्कजवळ निर्जन रस्त्यावर आढळला. मुलाच्या शोधासाठी कुटुंबाने पोलिसांची मदत घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो एका दुचाकीस्वारासोबत जाताना दिसला. रात्री १ वाजता कुटुंबाला अज्ञात नंबरवरून फोन आला आणि ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. दुसऱ्या दिवशी घरच्यांना विविध लोकेशन्सवर फिरवत ठेवण्यात आले. शेवटी अपहरणकर्त्यांचा फोन बंद झाला.

पोलिसांचा तपास आणि एन्काउंटर ३१ जुलै रोजी संध्याकाळी, निश्चितचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. यानंतर पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला. गुरुवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी कगलीपुरा परिसरात लपलेले होते. पोलिसांनी सापळा रचून त्यांना सरेंडर करण्यास सांगितले, मात्र आरोपींनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात दोन आरोपी जखमी झाले आणि दोघांना अटक करण्यात आली.

अतिरिक्त तपशील:

  • अटक आरोपींची नावे: गुरुमूर्ती आणि गोपीकृष्ण
  • मुख्य आरोपी गुरुमूर्ती हा निश्चितच्या कुटुंबाचा माजी ड्रायव्हर होता
  • गुरुमूर्तीची मुलाच्या आईसह 8 महिन्यांपासून ओळख होती
  • पाणीपुरीचं आमिष दाखवून त्याने मुलाचे अपहरण केले
  • खून केल्यानंतर खंडणी मागून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

अपहरण की वैयक्तिक सूड?

पोलिस तपासात हा गुन्हा केवळ खंडणीसाठी होता की इतर कोणताही सूडभावना, भावनिक गुंतवणूक यामागे होती का, याचा सखोल तपास सुरू आहे.