सोलापूर शहर विकासाच्या १३ मागण्या मंजूर; फडणवीस सरकारकडून तत्वतः मान्यता
.jpeg)
सोलापूर प्रतिनिधी:
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी १३
महत्त्वाच्या कामांची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. या मागण्यांना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता दिली
असून सोलापूरकरांसाठी दिलासादायक घोषणा केल्या. बुधवारी मुंबई येथे पश्चिम
महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांच्या बैठकीत सोलापूरच्या विकासावर सविस्तर चर्चा
झाली. यावेळी कोठे यांनी आयटी पार्क सुरु करणे, पूर्व भागात सुपर
स्पेशालिटी हॉस्पिटल, ६० मीटरचा डीपी रोड, भटक्या विमुक्त जातींसाठी ४० हजार घरकुल योजना, मुंबई
व तिरुपतीसाठी विमानसेवा, ८५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा
कार्यारंभ, १०० इलेक्ट्रिक बसेस, सोलापुरातील
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, झोपडपट्टी पुनर्विकास
योजना यासह अन्य कामांची मागणी केली.
विशेष मागण्या:
- सिद्धरामेश्वर संस्थानाच्या परिसराचा
विकास
- वस्त्रोद्योगासाठी सबसिडी व सवलती
- म. गांधी प्राणी संग्रहालयासाठी २०
कोटींचा निधी
- धर्मवीर संभाजी महाराज तलावाचा ६०
कोटींचा प्रकल्प
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामांना सकारात्मक
प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की सोलापूरच्या विकासासाठी तातडीने अंमलबजावणी
केली जाईल कोट:
"सोलापूरचा विकास आता
थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या सर्व मागण्या मान्य
केल्याबद्दल सोलापुरातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो."
— आमदार देवेंद्र कोठे
या बैठकीस सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम
महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघातील आमदार उपस्थित होते.