१२ किल्ल्यांचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश
.jpeg)
मुंबई : महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे मराठा साम्राज्याचा लष्करी पराक्रम
आणि स्थापत्यवैभवाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि
तामिळनाडूतील एक जिंजी किल्ला सामील झाला आहे. हे किल्ले सतराव्या
ते एकोणिसाव्या शतकात बांधण्यात आले असून, मराठा साम्राज्याच्या रणनीतीचे आणि
असामान्य तटबंदीचे प्रतीक मानले जातात.
कुठले किल्ले जागतिक वारसा यादीत
सामील?
✅ रायगड
✅ राजगड
✅ प्रतापगड
✅ पन्हाळा
✅ शिवनेरी
✅ लोहगड
✅ साल्हेर
✅ सिंधुदुर्ग
✅ विजयदुर्ग
✅ सुवर्णदुर्ग
✅ खांदेरी
✅ (तामिळनाडू) जिंजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आनंद
मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद
व्यक्त करत म्हटले, "हे केवळ अभिमानास्पद नाही, तर शिवरायांच्या गडकोटांचे 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून जागतिक सन्मान आहे. स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांनी
उभारलेले हे किल्ले लढवय्यांमधील मुत्सद्दीपणाचे आणि स्थापत्यकौशल्याचे प्रतिक
आहेत." मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
यांच्या नेतृत्वाखाली, तसेच केंद्रीय पातळीवरील
सहकार्यामुळे हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला. पुरातत्त्व विभाग, युनेस्कोचे भारतातील प्रतिनिधी, अनेक मंत्री व अधिकार्यांनी या यशात मोलाचा वाटा उचलला.
किल्ल्यांचे वैशिष्ट्य – माची
स्थापत्य
या किल्ल्यांमध्ये "माची
स्थापत्य" ही जगात कुठेही न आढळणारी रचना आहे. माची म्हणजे किल्ल्याच्या
सुरक्षिततेसाठी विशेष रचलेला भाग. शत्रूला गडाची संपूर्ण माहिती कळू नये, यासाठी अतिशय मुत्सद्दीपणे हे गड उभारले गेले होते.
महाराष्ट्रातील इतर जागतिक वारसा
स्थळे
या आधी महाराष्ट्रातील –
- अजिंठा
लेणी
- वेरूळ
लेणी
- छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)
- व्हिक्टोरियन
आणि आर्ट डेको इमारती समूह (मुंबई)
- एलिफंटा
लेणी
यांचा जागतिक वारसा यादीत समावेश
होता. आता शिवरायांचे किल्लेही या गौरवात सामील झाले.