बारा बांगलादेशी घुसखोरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

सोलापूर: कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता भारतात घुसखोरी करणाऱ्या
१२ बांगलादेशी नागरिकांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने
त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई
करून या बांगलादेशी नागरिकांना अटक केली. सोलापुरातील एमआयडीसी भागात हे सर्वजण
टेलरिंगचे काम करत होते. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही व्हिसा
किंवा पासपोर्ट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास सुरू - घुसखोरीचा मार्ग आणि हेतू
शोधणार
🔸 या घुसखोरांनी
कोणत्या मार्गाने भारतात प्रवेश केला?
🔸 त्यांचा सोलापुरात वास्तव्यास असण्यामागील
उद्देश काय?
🔸 कोणत्या संघटनेशी त्यांचा संबंध आहे का?
याचा सखोल तपास केला जात असल्याची
माहिती पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची
नावे:
1 नासीर सरकार मो. बदी
उज्जमा (२२) - राजशाही, बांगलादेश
2 मोहम्मद नजीरउल्ला
इस्लाम (३०) - भोगूर, बांगलादेश
3 मोहम्मद मिजानूर
रोहमन (२६) - नेत्रकोना, बांगलादेश
4 बाबुमिया सुलतान
(२५) - शरियतपुर, बांगलादेश
5 शफिक रशिद मोंडल
(३१) - ढाका, बांगलादेश
6 मोहम्मद रहुलआमीन
खलील फोराजी (३३) - पश्चिम बंगाल, बांगलादेश
7 इम्रान नुरआलम हुसेन
(२७) - शरियतपुर, बांगलादेश
8 महमद हजरतअली पोलाश
(३१) - बोगुरा, बांगलादेश
9 महमद हजरतअली पोलाश
(३१) - बुगुरा, बांगलादेश
10 मोहम्मद सोहेल
जाबेदअल्ली सरदार (२२) - ढाका, बांगलादेश
11 अलाल नुरइस्लाम
मियाँ (३५) - पश्चिम बंगाल, बांगलादेश
12 मोहम्मद अलीमीन
हानिफ बेफिरी (२९) - पश्चिम बंगाल, बांगलादेश
पुढील तपास सुरू पोलीस या प्रकरणाचा
पुढील तपास करत असून या घुसखोरांना मदत करणाऱ्या स्थानिकांची चौकशी केली जात आहे.