आजचे राशी भविष्य

मेष- स्वबळावर कामास न्याय देण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची साथ मिळण्यासाठी आहाराचे नियम पाळा.

वृषभ - मोठी गुंतवणूक करण्यावर भर द्याल. बुद्धिसामर्थ आपल्यात असल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

मिथुन - मित्रांच्या सहकार्याने कामे होतील. उलाढालीतील गुंता सोडण्यात आपणास स्वतः निर्णय घ्यावा लागेल.

कर्क:- कामाचे नियोजन केल्यास लाभ होईल. नात्यात सलोखा निर्माण होईल. ज्येष्ठांचे मत विचारात घ्या.

सिंह- आरोग्याची साथ लाभल्या ताजेतवाने वाटेल. प्रिय व्यक्तीच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यास प्राधान्य द्याल.

कन्या- हितसंबधाची जपणूक करण्यासाठी तडजोडीची भूमिका घ्या. नकारात्मक विचारांचा आधार घेऊ नका.

तूळ - लोकांची पारख करुनच जवळीक वाढवा. वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या.

वृश्चिक- व्यवहारात बाजी माराल. वैवाहिक जीवनातील जबाबदारीत वाढ होईल. समाधानकारक प्रगती होईल.

धनु- स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची नामी योजना समोर येईल. आरोग्यातील सुधारणा नवा हुरुप प्रदान करेल.

मकर- देवाणघेवाण सुयोग्य पद्धतीने होईल. व्यवहारात सावध पवित्रा घ्यावा लागेल. आहारावर निर्बंध ठेवा.

कुंभ:- कुटुंबातील व कार्यक्षेत्रातील जबाबदारीचे संतुलन ठेवणे अगत्याचे. मन शांत ठेवून कार्यातील गुंता सोडवा.

मीन- कार्यक्षेत्रात नव्या संधीचे दालन खुले होण्याची संभावना आज आहे. सुरवातीस सावध पवित्रा घ्या.