महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वैभव बोराडे यांचा सोलापुरात भव्य नागरिक सत्कार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत PIS पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणारे वैभव इंदू मसा बोराडे यांचा आज जय प्रकाश हॉल येथे भव्य नागरिक सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते वैभव बोराडे यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर वैभव बोराडे यांनी मिळवलेले यश हे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी वैभव बोराडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “ग्रामीण भागातील युवकांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, हे वैभव बोराडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून त्यांनी भविष्यातही प्रामाणिकपणे कार्य करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे. सोलापूर शहराला त्यांचा अभिमान आहे,” असे ते म्हणाले. या सत्कार समारंभास दिलीप कोल्हे, नगरसेवक गणेश दादा वानकर, नगरसेवक सुनील कटके, नगरसेविका मृण्मयी गवळी, नगरसेविका सोनाली गायकवाड, उद्योजक जयदीप जानकर, आकाश जाधव, स्वप्निल मोरे, सोपान घाडगे, विनोद ससाणे, ॲलन काळे, प्रकाश घोडके तसेच ए. जी. प्रतिष्ठान मित्रपरिवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी वैभव बोराडे यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.