छ. शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

विजयपूर :- शहरातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था  छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने विजयपूर जिल्हा कार्यरत पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील रवींद्रनाथ टागोर स्कूल अँड कॉलेजच्या  मंडळाच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी नवे अध्यक्ष अशोक यडहळ्ळी, उपाध्यक्ष शशि मेडेगार, खजिनदार राहुल आपटे आणि कार्यकारिणी सदस्य गुरुराज गद्दनकेरी यांचा  सत्कार करण्यात आला  या वेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी विजयकुमार सारवड, प्राचार्य अभिजीत गायकवाड, तसेच शिक्षक गजानन काळे प्रल्हाद हुगार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.