भावाच्या मदतीने प्रेयसीने केला प्रियकरचा खून

विजयपूर :  आपल्या भावाच्या मदतीने प्रेयसीनेच आपल्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना विजयपूर शहरातील जामिया मशिदीजवळील अमन कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे. खून झालेल्या दुर्दैवी युवकाची ओळख समीर इनामदार (वय २६) अशी झाली आहे. मृत समीर हा तैयबा हिचा प्रियकर असल्याचे सांगितले जात असून, तैयबाने आपल्या भाऊ असलम बागवान यांच्या मदतीने समीरचा गळा आवळून खून केला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. समीर सतत त्रास देत असल्याने कंटाळून हा खून केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच खरं सत्य बाहेर येणार आहे. समीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच गोलगुमठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून या प्रकरणासंदर्भात गोलगुमठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.