जिल्हा परिषदेतही कमळ फुलणार; प्राथमिक निकालानुसार भाजपा आघाडीवर

शांभवी कल्याणशेट्टी यांच्या रूपाने विद्यमान आमदार पत्नी प्रथमच जिल्हा परिषदेत जाणार आहेत. दुसरीकडे संस्कृती सातपुते यांच्या रूपाने माजी आमदार पत्नी जिल्हा परिषदेत जाणार आहेत. या दोघी भाजपाच्या आहेत. 

 सोलापूर:- केंद्र राज्य राज्यातील बहुतांश महानगरपालिका नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतही कमळ फुलणार असल्याचे चित्र आहे. मतमोजणीच्या प्रारंभीच्या कलानुसार भारतीय जनता पक्ष बहुतांश ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसून येते. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाचा वारू रोखण्यासाठी जोरदार टक्कर दिली आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टी गटातून राष्ट्रवादीच्या विजयराज डोंगरे यांनी विजय मिळवला आहे. आष्टी गटासह पंचायत समितीच्या दोन्ही गणातही राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. माळशिरस तालुक्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या दहिगावमध्ये माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी संस्कृती सातपुते विजयी विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान आमदार उत्तम जानकर यांच्या सुपुत्राचा पराभव केला. सांगोल्यामध्ये शिवसेनेने आपली ताकद राखली आहे. बोरामणी जिल्हा परिषद गटातून भाजपचे नेताजी खंडागळे यांनी ८४४ मतांनी विजय मिळवला आहे. बोरामणी गणातून  भाजपच्या वर्षा पटणे  यांनी २१३९ मतांनी विजयी विजय मिळवला. कासेगाव गणातून भाजपचे विजय राठोड यांनी २२८८ मतांनी विजय मिळवला. करकंब गटात भाजपचे आदिनाथ देशमुख १११६ मतांनी विजय मिळवला आहे. माळशिरस तालुक्यातील दहिगाव पंचायत समिती गणात अर्जुनसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाला आहे. भाजपच्या तनुजा खिलारे यांनी 60 मतांनी अर्जुन सिंह यांचा पराभव केला. चपळगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या शांभवी कल्याण शेट्टी 7158 मतांनी विजयी झाल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गणातून भाजपचे सागर कल्याणशेट्टी आणि कुरनूर विनोद मोरे विजयी झाले आहेत.  बार्शी तालुक्यात पहिल्या सत्रात भारतीय जनता पक्ष आणि पुरस्कृत उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. करमाळा तालुक्यातील पांडे गटात भाजपाच्या रश्मी बागल या 2200 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर  पांडे गणातुन - स्वप्नील काळे आणि रावगाव गणातून - संध्या कांबळे विजयी झाल्या आहेत.

शांभवी कल्याणशेट्टी यांच्या रूपाने विद्यमान आमदार पत्नी प्रथमच जिल्हा परिषदेत जाणार आहेत. दुसरीकडे संस्कृती सातपुते यांच्या रूपाने माजी आमदार पत्नी जिल्हा परिषदेत जाणार आहेत. या दोघी भाजपाच्या आहेत.

(बातमी अपडेट करत आहोत)