सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक सुनील सदारंगानी यांची उंच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या
सोलापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि मुलतानी बेकरीचे
मालक सुनील सदारंगानी यांनी गुरुवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास
विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
घडली. या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये
शोककळा पसरली आहे. आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल घटनेपूर्वी सदारंगानी हे पनाश
अपार्टमेंटच्या १७व्या मजल्यावर हात जोडून उभे असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर
मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुरुवातीला इमारतीच्या कोपऱ्यावर फिरत असलेली
व्यक्ती कोण आहे, याची कल्पना उपस्थितांना नव्हती. मात्र
नंतर ही व्यक्ती सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक असल्याचे समोर आले. प्रत्यक्षदर्शींनुसार,
सदारंगानी हे काही काळ प्रार्थना करत असल्यासारखे हात जोडून उभे
होते. खाली झोकून देण्याचा प्रयत्न करत असताना सोसायटीमधील
एका व्यक्तीने त्यांना समजावून खाली आणले. मात्र त्यानंतर
त्यांनी त्या व्यक्तीच्या हाताला झटका देत पुन्हा वर जाऊन उडी मारल्याची प्राथमिक
माहिती समोर आली आहे. परिसरात खळबळ घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस
सर्व बाजूंनी तपास करत आहेत. शहरात शोककळा सुनील सदारंगानी हे सोलापूरमधील एक परिचित
आणि प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनामुळे
व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.