सांगोला पंचायत समितीत राणी पाटील विजयी; सूनबाईंच्या विजयाने शहाजीबापू पाटील भावूक
सांगोला पंचायत समिती निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांच्या सूनबाई राणी पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाची बातमी समजताच शहाजीबापू पाटील यांना भावना अनावर झाल्या असून, ते अक्षरशः अश्रूंनी भरून आले. राणी पाटील यांच्या विजयामुळे पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, शहाजीबापू पाटील यांनी आपल्या पुतण्या आणि सूनेसोबत जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. कार्यकर्ते आणि समर्थकांनीही मोठ्या उत्साहात हा विजय साजरा करत एकच जल्लोष केला.स्थानिक राजकारणात प्रभाव असलेल्या पाटील कुटुंबासाठी हा विजय प्रतिष्ठेचा मानला जात असून, पंचायत समितीमध्ये पाटील गटाची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. राणी पाटील यांच्या विजयाने सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू आहे.