नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणराज तरुण मंडळाच्या लेझीम सरावाला उत्साहात सुरुवात
सोलापूर : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एन. जी. मिल चाळ येथील गणराज
तरुण मंडळ नवरात्र महोत्सव – गिरणगावची माता मंडळाच्या वतीने लेझीम सरावाचा
शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. या वेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या
हस्ते लेझीम आणि ढोल साहित्याचे विधिवत पूजन करून सरावाला सुरुवात करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला भाजपचे नेते तथा माजी उपमहापौर दिलीप
कोल्हे, राजन जाधव, माऊली
पवार, नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर
उपस्थित होते. तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी
झाले.
आमदार कोठेंनी धरला लेझीमचा ठेका
लेझीम आणि ढोल साहित्याच्या पूजनानंतर आमदार देवेंद्र
कोठे यांनी स्वतः लेझीम हातात घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत लेझीमचा बहारदार
खेळ सादर केला. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी नवरात्र
उत्सवासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा
दिल्या.