भीमाशंकर अभयारण्यातील वृक्षतोडीविरोधात युवासेनेची सह्यांची मोहीम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : भीमाशंकर अभयारण्य परिसरात प्रस्तावित टोरंट प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली. युवासेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख राम वाकसे, ग्रामीण जिल्हाप्रमुख रमेश चौगुले आणि शहरप्रमुख तुषार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होऊ नये, वनसंपत्तीचे संरक्षण व्हावे आणि निसर्गाचा समतोल कायम राहावा, या उद्देशाने युवासेनेने या मोहिमेचे आयोजन केले. वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांकडे शासन आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सह्यांच्या माध्यमातून जनमत एकत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. निसर्गाचे रक्षण, वृक्षांचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भविष्यातही युवासेना जनहिताच्या उपक्रमांमध्ये अग्रभागी राहील, असा विश्वास युवासेनेचे शहरप्रमुख तुषार आवताडे यांनी व्यक्त केला. या मोहिमेस युवासेनेचे सचिन बागल, सोलापूर दक्षिणचे शहरप्रमुख दत्ता जाधव, जिल्हा समन्वयक प्रसाद माने, उपजिल्हाप्रमुख ऋषिकेश धाराशिवकर, नागनाथ सिंदगी, शहर मध्य चिटणीस प्रकाश नाईकवाडी, कॉलेज कक्षाचे समर्थ गायकवाड, नितीन काटकर, शहर उत्तर समन्वयक गोरख कणसे, दिगंबर मल्लाव, कबीर शेख, अभिषेक मॅकल, अनिल जाधव, गणेश होटकर, ॲड. गणेश बनसोडे, महेश माने, ऋषिकेश जाधव, ओंकार जाधव, सिद्धाराम तरडे, नितीन भोसले, अभिजीत गव्हाणे आणि दिनेश माने यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.