सोलापुरात डी मार्टसमोर ट्रक आणि ट्रॅव्हलरची धडक; दोन चालक गंभीर जखमी

सोलापूर : छत्रपती संभाजी चौक ते रूपाभवानी रोडवरील डी मार्टसमोर ट्रक आणि ट्रॅव्हलर यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डी मार्टसमोर वाहनांचा वेग कमी होत असताना ट्रॅव्हलरची ट्रकला, तर ट्रकची ट्रॅव्हलरला धडक बसली. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही चालकांना ट्रॅफिक पोलीस आणि जोडभावी पोलिसांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. याबाबतची माहिती ट्रॅफिक पोलीस विभागाचे एपीआय प्रशांत क्षीरसागर यांनी दिली.