पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला
.jpeg)
कराची: भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून
दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. भारताच्या या 'ऑपरेशन सिंदूर'चा जबरदस्त तडाखा पाकिस्तानच्या भूमीसह पाकिस्तानच्या शेअर मार्केटलाही
बसला. पाकिस्तानच्या शेअर बाजारात बुधवारी सकाळी प्रचंड मोठी घसरण नोंदवली गेली.
कराची शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक KSE-100 तब्बल 6272
अंकांनी म्हणजेच 5.5 टक्क्यांनी घसरला. या घसरणीनंतर निर्देशांक 113568.51 वरून
थेट 107296.64 या पातळीवर आला. 23 एप्रिल ते 5 मे या कालावधीत कराची स्टॉक
एक्स्चेंजचा बेंचमार्क KSE-100 निर्देशांक 3.7 टक्क्यांनी
घसरला आहे. भारत लष्करी कारवाई करेल या भीतीने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते.
गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मंगळवारी 6 एप्रिल
रोजी रात्री भारताने केलेल्या हल्ल्यानंतर त्याचे थेट पडसाद कराची आणि पाकिस्तान
शेअर बाजारात उमटले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात आधीच 3.7
टक्के घसरण झाली होती, जी ऑपरेशन सिंदूरनंतर अधिक गडद झाली.
याउलट भारतातील सेन्सेक्स निर्देशांकात याच कालावधीत 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.