डीसीसी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा भाजप संपर्क कार्यालयात सत्कार
अक्कलकोट : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी बँक)
संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा
अक्कलकोट येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात उत्साहात सत्कार करण्यात
आला. या कार्यक्रमाला सद्गुरू श्री ब्रह्म. शिवपुत्र महास्वामीजी, श्री
सद्गुरू बसवारूढ मठाचे मठाधिपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन
यावेळी सुरेश पाटील, बाबुराव जमादार, संदीप महाले,
नितीन शेजुळ, व्यंकटेश ज्याटगल, प्रवीण डोळे, अक्षय पाटील आणि सिद्धारूढ गदळकर
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आमदार सचिन
कल्याणशेट्टी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील
राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अक्कलकोट परिसरात आनंदाचे वातावरण
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची डीसीसी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध
निवड झाल्याने अक्कलकोटसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या
निवडीबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.