रश्मिका मंदाना–विजय देवरकोंडा विवाहबंधनात; उदयपूरमध्ये पार पडला खासगी सोहळा
गेल्या अनेक वर्षांपासून
ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आला आहे. चित्रपटसृष्टीतील चर्चेत
असलेली जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अधिकृतपणे विवाहबंधनात अडकले आहेत.
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर येथील
नयनरम्य वातावरणात, मोजक्या मित्रमंडळी व कुटुंबीयांच्या
उपस्थितीत हा खासगी विवाह सोहळा पार पडला. हा विवाह दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा
सुंदर संगम ठरला. सकाळी तेलुगू परंपरेनुसार विधी पार पडले, तर
संध्याकाळी ५ वाजता रश्मिकाच्या मूळ कोडवा (कुर्ग) परंपरेनुसार लग्नसोहळा संपन्न
झाला. लग्नानंतर नवविवाहित जोडप्याने पापाराझींना मिठाई वाटत आनंद साजरा केला.लग्नानंतर
विजयने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने आपल्या भावना व्यक्त
करत लिहिले की, “एके दिवशी मला तिची इतकी आठवण येत होती की
ती माझ्यासोबत असेल तरच माझा दिवस पूर्ण होईल असे वाटायचे. ती समोर बसली तर जेवण
अधिक चवदार होईल, ती सोबत असेल तर वर्कआउटही सोपे होईल. जिथे
कुठे असलो तरी घरी आणि शांततेत राहण्यासाठी मला तिची गरज होती. म्हणून मी माझ्या
जिवलग मैत्रिणीला माझी पत्नी बनवले. 26.02.2026.” या विवाहामुळे
चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.