महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 सादर; शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठ्या विकास योजनांची घोषणा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विविध सामाजिक, कृषी, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी यंदाचे वर्ष ‘सामाजिक, समता व समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष समिती आणि निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले. याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास आराखडा राबवण्याची घोषणा करण्यात आली. तसेच संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमी जोडून ‘तीर्थक्षेत्र सर्किट’ विकसित करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.
ग्रामीण विकासासाठी ‘संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान’
सुरू करण्यात येणार असून राज्यातील ७५ गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार
आहे.
अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा
1.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना
२ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी; नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार
रुपयांचे प्रोत्साहन अनुदान.
2.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात येणार
तसेच त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करण्यात येणार.
3.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’
पुढेही सुरू राहणार असून यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद.
4.
राज्यात १,२०० किमी मेट्रो मार्ग आणि ६,००० किमी द्रुतगती मार्ग विकसित करण्याची योजना; मुंबई-पुणे
हायस्पीड ट्रेन प्रकल्पासाठीही तरतूद.
5.
नवीन गुंतवणूक धोरणातून ५० लाख प्रत्यक्ष रोजगार
निर्मितीचे उद्दिष्ट; गडचिरोली येथे नवे ‘स्टील हब’ विकसित
करण्यात येणार.
6.
मुंबई येथे
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ स्थापन करण्याची घोषणा; राज्यात २९५ हून अधिक गेमिंग स्टुडिओ उभारण्याची योजना.
7.
वासोटा किल्ल्यावर (सातारा) येथे रोप-वे प्रकल्प आणि नागपूर (रामटेक) येथे तिसरी चित्रसृष्टी
उभारली जाणार.
8.
‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत’ मध्ये
शेतमजुरांचाही समावेश करण्यात येणार तसेच नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात
येणार.
या अर्थसंकल्पात शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन,
उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला असून
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली
आहे.