पालकमंत्री जयकुमार गोरे यांची होटगी मठाला भेट; जगद्गुरूंचे घेतले आशीर्वाद
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी मंदिर, होटगी मठ येथे भेट देऊन श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. या भेटीदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून संवाद साधला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरूंचे आशीर्वाद मिळावेत, अशी विनंतीही गोरे यांनी यावेळी केली. याप्रसंगी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक शिवानंद पाटील, भाजपच्या सरचिटणीस सुधा अल्लीमोरे आदी उपस्थित होते.