भिनव सामाजिक संस्थेच्या वतीने ५१ सुवासिनींची ओटी भरून नवरात्रोत्सव साजरा

सोलापूर : अभिनव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने नवरात्रीच्या नवमीचे औचित्य साधून जय भवानी सोसायटी, अंत्रोळीकर नगर येथील देवीच्या मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनलताई दास यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या सामूहिक महाआरतीने करण्यात आली. यावेळी परिसरातील ५१ सुवासिनी महिलांची ब्लाउज पीस देऊन पारंपरिक पद्धतीने ओटी भरण्यात आली. तसेच कुमारिकांचे पूजन करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे जय भवानी सोसायटी, अंत्रोळीकर नगर आणि आसपासच्या परिसरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय भवानी मंदिर समितीचे अध्यक्ष भोसले दाम्पत्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सोहळ्याला अभिनव सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनलताई दास, जिल्हा संघटक अनिता वाघमारे, प्राजक्ता कुलकर्णी, जय भवानी सोसायटीतील प्रियंका भोसले, चंदाराणी भोसले, अनुजा माळवदकर, दीपाली हळकुंदे, सोनाबाई शिंदे, विद्या गोणे, स्नेहल गोरे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.