कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना कन्यारत्न प्राप्त; ७ नोव्हेंबरला घरात नवा पाहुणा

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे, कारण कतरिनाने आज ७ नोव्हेंबर २०२५ रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या आनंदाच्या बातमीची घोषणा कतरिना आणि विकी कौशलने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत केली आहे. विकीने आपल्या पोस्टमध्ये “आमच्या आनंदाची छोटी भेट आम्हाला मिळाली आहे. आभार व्यक्त करत आम्ही आमच्या छोट्या बाळाचं स्वागत करत आहोत.असे लिहिले असून पोस्टसोबत आशीर्वाद आणि “ॐ” असे कॅप्शन दिले आहे. कतरिना आणि विकीच्या या पोस्टवरून चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, रणवीर सिंग, आणि करण जौहर यांनी या जोडीला अभिनंदनाचे संदेश दिले आहेत. दोघांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा येथे शाही थाटात विवाह केला होता. या विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते. कतरिना आणि विकीची पहिली भेट २०१९ मध्ये स्क्रीन अवॉर्ड्सदरम्यान झाली होती. त्यानंतर करण जौहरच्या पार्टीत झालेल्या दुसऱ्या भेटीतून दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि ती पुढे प्रेमात बदलली. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कतरिना-विकी कौशल जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चाहत्यांकडून “Welcome Baby Kaushal!” अशा शुभेच्छांनी सोशल मीडिया गजबजला आहे.