बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात; होणाऱ्या पत्नीचं नाव आणि चेहरा अखेर समोर आला!
बिग बॉस मराठी ५ मध्ये विजयी झाल्यानंतर सूरज चव्हाणला
प्रचंड लोकप्रियता मिळाली. रिल स्टार म्हणून सुरुवात करणारा सूरज आता
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. त्याच्या साधेपणामुळे आणि मनमिळावूपणामुळे
चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. गेल्या काही दिवसांपासून सूरज एका खास
कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर
केला होता, ज्यात तो आपल्या होणाऱ्या बायकोसोबत
दिसला होता. मात्र, त्या व्हिडिओत त्याने तिचा चेहरा दाखवला
नव्हता, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.आता
अखेर त्याच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा आणि नाव समोर आले आहे. कोकण हार्टेड गर्ल
अंकिता वालवलकर हिने इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने सूरज आणि
त्याच्या होणाऱ्या पत्नीला घरी केळवणासाठी आमंत्रित केलं होतं. या व्हिडिओमध्ये
सूरज आणि त्याची होणारी पत्नी दोघांनी एकत्र उखाणा घेतला असून, एकमेकांना गोड पदार्थ भरवले आहेत. सूरजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव संजना असल्याचं
समोर आलं आहे. तिचा साधेपणा आणि हसरा स्वभाव चाहत्यांना प्रचंड भावला आहे.
व्हिडिओमध्ये सूरज आणि संजनाची जुळवाजुळव चाहत्यांना विशेष आवडली असून, कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संजना आणि सूरजच्या लग्नाबाबत
अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, दोघे डिसेंबर महिन्यात
लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नाला ‘बिग बॉस मराठी’चे
स्पर्धक आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.