बिहार विजयात विनोद तावडेंची निर्णायक भूमिका; भाजपात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वाढली .
बिहार: NDA च्या दणदणीत विजयाने बिहारचे राजकीय
चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपात नवे समीकरण आकार घेताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील वरिष्ठ नेता आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव
अचानक चर्चेत आले आहे. बिहार निवडणुकीत उमेदवारांची काटेकोर निवड, ओबीसी समीकरण, आणि संघटनात्मक रणनीती तयार करण्यात
तावडे यांनी बजावलेली महत्वाची भूमिका निर्णायक ठरली असल्याचे मानले जात आहे. बिहार
निवडणुकीसाठी प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि सह-प्रभारी विनोद तावडे हे मागील काही
महिन्यांपासून राज्यात तळ ठोकून बसले होते. दोघांनीही स्थानिक सामाजिक रचना,
मतदारवर्ग, आणि निवडणुकीच्या वातावरणाचे
बारकाईने विश्लेषण करून आक्रमक रणनीती आखली. त्याचाच परिणाम म्हणून भाजपने
सर्वाधिक जागा जिंकून राज्यात स्वतःचे वर्चस्व अधिक मजबूत केले.
उमेदवार निवडीत तावडे यांची भूमिका महत्त्वाची
भाजपच्या अंतर्गत चर्चांनुसार, विनोद तावडे यांनी प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराचे प्रोफाइल, स्थानिक गणित आणि जातीय समीकरणांची अचूक मांडणी केली.
त्यांच्या रणनीतीचा एक भाग म्हणून लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांना
निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले, ज्याचा परिणाम स्थानिक
जनमतावर पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तावडे यांच्या संघटनात्मक कौशल्याचा,
निवडणूक व्यवस्थापनाचा आणि मायक्रो-लेवल प्लॅनिंगचा NDA च्या विजयात मोठा वाटा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपात मोठे पद मिळू शकते?
राजकीय तज्ञ सांगतात की, बिहार विजयात तावडे यांच्या महत्त्वपूर्ण
भूमिकेमुळे त्यांना
- राष्ट्रीय स्तरावरील
मोठे पद
किंवा - केंद्र सरकार किंवा
संघटनेत महत्त्वाची जबाबदारी
मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत तावडे यांची प्रतिक्रिया NDA च्या विजयामुळे बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू असताना,
बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले—
“आम्ही बिहारची निवडणूक नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढलो,
हे सत्य आहे. पण मुख्यमंत्री कोण असेल हे NDA मधील
पाचही पक्ष एकत्र बसून ठरवतील.” त्यांच्या या विधानामुळे NDA च्या आतल्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे.