सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; आंतरराज्यीय टोळी अटक, ६ मोटारसायकली जप्त
सोलापूर : शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा
घालण्यासाठी सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आंतरराज्यीय
चोरट्यांना अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल ६ मोटारसायकली आणि १ लाख ७५ हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक आयुक्त राजन माने यांच्या
मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद
माने यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर
आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही चित्रफितींचे बारकाईने विश्लेषण केले. दरम्यान,
गुप्त माहितीच्या आधारे गंगामाई रुग्णालय परिसरात सापळा रचण्यात
आला. यावेळी प्रमोद अर्जुन जेऊर (वय २१) आणि अमोल भाऊसाहेब चव्हाण (वय २६),
दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी, यांना
ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सोलापूर शहरातून मागील सहा महिन्यांत सहा
मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
जप्त करण्यात आलेली वाहने
- एमएच-१३-डीपी-१९२७ –
किंमत ₹१५,०००
- एमएच-१०-बाय-४६९२ –
किंमत ₹१०,०००
- एमएच-१३-बीडी-०५३२ –
किंमत ₹१५,०००
- एमएच-१३-एवाय-७७५२ –
किंमत ₹३५,०००
- एमएच-१३-बीडब्ल्यू-३९९७
– किंमत ₹५०,०००
- एमएच-१३-ईडी-४४१३ –
किंमत ₹५०,०००
एकूण मुद्देमाल : ₹१,७५,०००
तपासात ही सर्व वाहने सदर बाजार, फौजदार चावडी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे
स्पष्ट झाले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सतर्कता आणि तांत्रिक तपासामुळे ही चोरीची
साखळी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.