‘व्होट चोरी’विरोधातील राहुल गांधींच्या महारॅलीत प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली सोलापूर काँग्रेसचा सहभाग
देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये आणि मतदारांच्या
मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर
‘चलो दिल्ली’ महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या महारॅलीत खासदार प्रणिती शिंदे
यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि
कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘व्होट चोरी’च्या
विरोधात, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या
मागणीसाठी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या
मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. देशभरातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या महारॅलीत सहभाग नोंदवला.
लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा आवाज
रामलीला मैदानावरील या महारॅलीत लोकशाही वाचवणे, मतदारांचे अधिकार अबाधित ठेवणे आणि संविधानातील मूल्यांचे संरक्षण करणे,
या मुद्द्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली. निवडणूक
प्रक्रियेत पारदर्शकता आणि शासनव्यवस्थेत उत्तरदायित्व असावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ‘ना भीती, ना दबाव, ना झुकण्याची तयारी’ असा निर्धार व्यक्त
करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. जनतेचा आवाज दाबता येणार नाही
आणि लोकशाहीत अंतिम निर्णय जनतेचाच असतो, असा संदेश या
महारॅलीतून देण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी सहभागी
या आंदोलनात सोलापूर शहर जिल्ह्यातून सोलापूर शहर
काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुकाध्यक्ष प्रशांत शाळे, सुलेमान तांबोळी,
पंढरपूर शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, प्रदेश
सचिव राहुल वर्धा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे,
मध्य विधानसभा युवक अध्यक्ष वाहिद बिजापूरे, उत्तर
विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, मीडिया प्रमुख तिरुपती
परकीपंडला यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.
तसेच रुपेश गायकवाड, सागर उबाळे, अनंत म्हेत्रे, गजानन जक्किकोरे, एजाज बागवान, विवेक कन्ना, शिवशंकर अंजनालकर, सुभाष वाघमारे, पृथ्वीराज नरोटे, सचिन पवार, संस्कार नरोटे, कालिदास काळपगार, व्यंकटेश बोमन, मोतीराम चव्हाण, रावसाहेब व्हनमाने, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, योगेश रणधीरे, शशिकांत शेळके, आकाश नाईक, पीयूष इंगळे, सिद्धेश्वर न्यामगौडा, संदीप मोरे, सुनील डोळसे, श्रीनिवास परकीपंडला, शंकर गायकवाड आणि मल्हारी फाळके यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील या आंदोलनात सहभाग नोंदवत ‘व्होट चोरी’विरोधातील पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा दिला.