शंकरगौडा पाटील यांना सहकार रत्न पुरस्कार

विजयपूर :- जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील यरनाळ गावातील व जिल्ह्यातील अनुभवी सहकारी तसेच  युवा सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष शंकरगौडा सिद्रामगौडा पाटील यांना राज्य सहकार महामंडळाच्या वतीने या वर्षाचा सहकार रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना सहकार रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विजयपूर जिल्हा सहकार भारती संघटना जिल्हाध्यक्ष श्रीहर्षगौडा पाटील, संघटना सचिव दीपक शिंत्रे, मुख्य सचिव परशराम चिंचली यांनी अभिनंदन केले आहे.