प्रा. अबुबकर मकानदार यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; संस्थेत उत्साह

सोलापूर :- श्री तपस्वीकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री. संगपण्णा केंगनाळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अबुबकर अ. रजाक मकानदार यांना एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शरणराज केंगनाळकर व प्राचार्य श्री. विद्यानंद स्वामी सर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संस्थेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

हायलाइट्स

  • प्रा. अबुबकर मकानदार यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
  • एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य तर्फे गौरव
  • संस्थेत सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती