सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींवर चप्पल फेकण्याची घटनेच्या निषेधार्थ दि.१६ ऑक्टोबर रोजी बंदची हाक - माजी आमदार प्रा. राजू आलगूर
विजयपूर
सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींवर चप्पल फेकण्याची घटना अतिशय गंभीर असून, ही घटना म्हणजे संविधानावरच झालेली थेट हल्ला आहे आणि ती अजिबात माफ करता येणार नाही, असे माजी आमदार प्रा. राजू आलगूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली असून, १६ ऑक्टोबर रोजी विजयपूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. प्रा. आलगूर म्हणाले की,बी. आर. गवई यांनी स्वतःच्या क्षमतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच त्यांच्याबद्दल अपप्रचार सुरू झाला. एक तथाकथित धार्मिक गुरू *अनिरुद्धाचार्य यांनी तर थेट त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. संघ परिवाराने पूर्वी “आपल्या मागे बळ आहे” या भ्रमात गोडसेच्या हातून गांधीजींची हत्या घडवून आणली, तसेच आता देखील आपल्यामागे शक्ती आहे’ या विचारातूनच हा वकील असा हिंसक प्रकार करतो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बराच उशीराने प्रतिक्रिया दिली**, तीही केवळ बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अशी टीकाही त्यांनी केली. एका दलित व्यक्तीने सर्वोच्च पद भूषवल्याचे काही मनुवादी शक्तींना सहन न झाल्यामुळेच हे षड्यंत्र रचले गेले असा आरोपही त्यांनी केला. प्रा. आलगूर यांनी पोलीस विभागाने स्वतःहून या प्रकरणात गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली.
संघ परिवाराने स्पष्ट भूमिका घ्यावी
संघ परिवाराच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयपूरमध्ये
होणाऱ्या पथसंचलन व सभेच्या पार्श्वभूमीवर, प्रा. आलगूर यांनी या घटनेबाबत संघ
परिवाराने अधिकृतरित्या निषेध नोंदवावा**, असे खुले आव्हान
दिले. “सगळे आपण हिंदू आहोत असे म्हणणारा संघ परिवार जर खरंच या प्रकाराच्या
विरोधात असेल, तर त्यांनी स्पष्ट निषेधाचा ठराव जाहीर करावा,”
असे त्यांनी सांगितले.
चप्पल फेकणारा वकील संघ परिवाराशी संबंधित असल्याचा आरोप
करत, ही जबाबदारी संघ परिवाराने स्वीकारावी आणि देशाची माफी मागावी**, अशी मागणी त्यांनी केली.
न्यायमूर्तीवर हल्ला करणारा मोकाट फिरतोय – त्याला शिक्षा
द्या"*
वरिष्ठ नेते अब्दुल हमीद मुश्रीफ यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीवर चप्पल फेकणारा व्यक्ती अजूनही मोकाट
आहे. “उद्या तोच व्यक्ती पंतप्रधानांवर चप्पल फेकेल, त्यालाही
माफ कराल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “त्याला
न्यायालयाने कडक शिक्षा द्यावी किंवा जामीन नाकारून तुरुंगात टाकावे,” अशी मागणी त्यांनी केली.
घटनेमागे संघ परिवारच – प्रमुखांना अटक करा"*
नेते एस.एम. पाटील गणिहार यांनी या घटनेमागे संघ परिवार
असल्याचा आरोप करत, “याआधी नियोजन आयोग रद्द करून संघाच्या
विचारसरणीवर आधारित धोरण आयोग स्थापन करण्यात आले. आता या घटनेमध्येही संघ
परिवाराच्या प्रमुखांची भूमिका आहे, म्हणून त्यांना तातडीने
अटक करावी,” अशी मागणी केली.
या पत्रकार
परिषदेला रमेश आसंगी, अभिषेक चक्रवर्ती, अडिवेप्पा
सालगल्ल, नागराज लंबु, अशोक चलवादी,
आनंद औदी, श्रीनाथ पूजारी, प्रभुगौडा पाटील, सिद्दू रायण्णावर, इरफान शेख, संतोष शहापूर, महादेव
रावजी, फयाज कलादगी, वसंत होणमोडे,
बाबू मिल्लेदार, अक्षय अजमानी यांच्यासह अनेक
नेते उपस्थित होते.