गुगलचा मोठा शोध! सुंदर पिचाईंची घोषणा — ‘AI मॉडेलने कॅन्सर उपचाराचा नवा मार्ग दाखवला’

कॅलिफोर्निया | १५ ऑक्टोबर २०२५:
गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी आज एक मोठी वैज्ञानिक अपडेट शेअर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, Google DeepMind च्या नवीन Gamma AI मॉडेलनं कॅन्सरवरील उपचाराचा संभाव्य नवीन मार्ग शोधून काढला आहे. 
सुंदर पिचाई यांनी आपल्या X (ट्विटर) पोस्टमध्ये लिहिले — “AI सायन्समध्ये एक उत्साहवर्धक माईलस्टोन गाठला गेला आहे. येल विद्यापीठासोबत तयार केलेल्या ‘C2S-Scale 27B’ या गॅमा बेस फाउंडेशन मॉडेलनं कॅन्सर सेल्सच्या वर्तनावर आधारित संभाव्य नवीन उपचार पद्धती विकसित केली आहे. शास्त्रज्ञांनी जिवंत पेशींवर प्रयोग करून या निष्कर्षाची पुष्टी केली आहे.”

पुढे ते म्हणाले —

अधिक प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांनंतर हा शोध कर्करोगाविरुद्धच्या लढाईत नवीन आणि आशादायक मार्गदर्शक ठरू शकतो.”

 गुगल आणि येलचे संयुक्त संशोधन:

या संशोधनात Google DeepMind आणि Yale University यांनी एकत्र काम केले. AI आधारित या मॉडेलनं कॅन्सर पेशींच्या वर्तनाचा अभ्यास करून संभाव्य उपचारात्मक रेणू (therapeutic molecules) शोधून काढले आहेत.

 ट्विटर/X वरची प्रतिक्रिया:

 गुगलचे माजी अभियंता म्हणाले —

“AI चा सर्वात मोठा सामाजिक प्रभाव याच ठिकाणी आहे — ऑन्कोलॉजीसारख्या विज्ञान शाखांतील संशोधनाला गती देणे. हे मनोरंजनापलीकडचं, समाजहितासाठीचं खरे उदाहरण आहे.”

 दुसरे युजर म्हणाले —

हे विज्ञानासाठी AI चं एक मोठं पाऊल आहे. हे मॉडेल सर्वसाधारण AI नसून, पेशी आणि रेण्वीय जीवशास्त्रावर केंद्रित आहे. २७ अब्ज पॅरामीटर्स असलेले मॉडेल म्हणजे विज्ञानासाठी मोठं यश.”

 तिसऱ्या युजरची प्रतिक्रिया —

कर्करोगाविरुद्धची लढाई ही सर्वात महत्त्वाची. इतर प्रयोगशाळांमधील निरर्थक प्रकल्पांपेक्षा हे अधिक अर्थपूर्ण आहे.”

 चौथ्या युजरने लिहिले —

माझे वडील कॅन्सरशी झुंजत आहेत. AI ने उपचार वेगाने मिळावेत हीच अपेक्षा आहे. धन्यवाद, Google!”

वैज्ञानिक आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्व:

हा शोध AI आणि आरोग्य विज्ञान यांच्या संगमातील एक ऐतिहासिक पाऊल मानला जात आहे. तज्ञांच्या मते, जर क्लिनिकल ट्रायल्स यशस्वी झाल्या, तर AI आधारित कॅन्सर थेरपी ही पुढील दशकातील आरोग्यक्रांती ठरू शकते.